बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्याना बळ द्या- कपाळे
साई आदर्शच्यावतीने १० वी १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
राहुरी ( प्रतिनिधी )
गुणवत्ता, जिद्द असली की यश निश्चित मिळते, आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी, पालकांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बळ द्या असे प्रतिपादन साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले.
साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने राहुरी तालुक्यातील दहावी व बारावीच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सोमवारी सकाळी पार पडला प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू, छत्रपती शिवाजी हायस्कुलचे प्राचार्य उत्तमराव खुळे, राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, मुंबई एसबीआयचे व्यवस्थापक अमित वाघपांजे, मेजर राजेंद्र कडू आदी उपस्थित होते.
प्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे असिस्टंट एक्झिक्युटिव्हपदी निवड झालेल्या देवळाली प्रवरातील स्वप्नील गाडेकर यांचा सन्मान करण्यात आला.
व
या प्रसंगी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रदीप गरड, पारस नहार, रंगनाथ घाडगे, धिरज कपाळे, संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके, प्रदीप विटनोर, शिवाजी मोरे, अनिल येवले, महेश बनकर, किरण कोळसे, संजय चौधरी, आप्पासाहेब कोबरने ,रवींद्र झावरे, आदिंसह विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश विघे यांनी तर आभार गोपीनाथ हरगुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श मल्टिस्टेटचे आधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते.


Post a Comment
0 Comments