Type Here to Get Search Results !

काल कार्यक्रमाला दांडी : आज तनपुरे शरद पवारांच्या गाडीत

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला शरद पवारांच्या गाडीत प्रवास चर्चा रंगली 

राहुरी ( प्रतिनिधी )

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पुण्यातील वर्धापन दिनाला दांडी मारल्यानंतर आज राहुरीत शरद पवार आणि प्राजक्त तनपुरे यांनी एकाच गाडीत प्रवास केला .

पवारांच्या राहुरीतील भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होत आहे .

गेले काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पवार पवारांच्या पक्षात विलीनीकरणाच्या चर्चा रंगलेल्या आहेत .


त्यातच काल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे ठिकाणी 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती दिसून आली .

 मात्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दांडी मारली व याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात झाली .

ही चर्चा सोशल मीडियावर व माध्यमांमध्ये पसरत असतानाच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सपत्नीक श्रीरामपूरला महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी जात असताना राहुरीत थांबले . यावेळी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांना आपल्या गाडीत पुढच्या सीटवर बसवून 10 किलोमीटरवर प्रवास केला. 


 राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम मधील कै. डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास्थळापर्यंत प्रवास केला . राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते कै डॉ बाबुराव बापूजी तनपुरे तथा दादासाहेब तनपुरे यांची पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिर शिबिराचे आयोजन करण्यात आले . यावेळी डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेला शरद पवार व अन्य नेत्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले . अहिल्या नगरचे  खासदार निलेश लंके, राहुरी  बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे , शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेशशेठ वाबळे , युवानेता व तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे , डॉ. तनपुरे कारखान्याचे , बाजार समितीचे सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , विवेकानंद नर्सिंग होम चे डॉक्टर्स , पदाधिकारी. विद्यार्थी यावेळी उपस्थित होते . माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या गाडीतील प्रवासाची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे .

Post a Comment

0 Comments