Type Here to Get Search Results !

डॉ. दादासाहेब तनपुरे पुण्यतिथी : प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने केले अभिवादन

डॉ. दादासाहेब तनपुरे पुण्यतिथी : प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने केले अभिवादन

राहुरी  ( प्रतिनिधी )

डॉ. दादासाहेब तनपुरे यांचे केवळ तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे, असे प्रतिपादन अकोला येथील जनलक्ष्मी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ पाटील नवले यांनी केले .



गुहा येथील प्रेरणा पतसंस्था व मल्टिस्टेटच्या वतीने संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे  समारंभाचे अध्यक्षस्थानी होते.


प्रमुख भाषणात भाऊ पाटील नवले म्हणाले, डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी राहुरी सहकारी साखर कारखाना उभा केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांच्या उभारणीतही त्यांनी मार्गदर्शन केले .मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था स्थापन करून आशिया खंडातील पहिला प्रयोग यशस्वी केला .तसेच मुळा धरणाच्या निर्मितीतून राहुरीच नव्हे तर जिल्ह्यात जिरायती भागाला पाणी मिळाले .त्यामुळे शेती समृद्ध झाली. व राहुरी येथे कृषी विद्यापीठ स्थापनात्यांच्या विकासाच्या कामामुळे आजही त्यांची कार्य प्रेरणादायी आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याशी संलग्न शिक्षण संस्था उभारल्या. त्यामुळे शिक्षणाची गंगा तालुक्यात खेड्यापाड्यात पोहोचली .यावेळी डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. जनलक्ष्मी पतसंस्था संचालक कैलास शेळके, राहुरी तालुका ट्रक ट्रान्सपोर्टचे मा.चेअरमन आप्पासाहेब कोहकडे, संचालक ज्ञानदेव हारदे व सभासद, कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते .
आभार प्रेरणा मल्टिस्टेट व्हा.चेअरमन प्रा.वेणुनाथ लांबे यांनी मानले.
   सहकार महर्षीं राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉ.बाबुराव दादा तनपुरे यांच्या २७ व्या पुण्यस्मरण दिनी प्रेरणा मल्टीस्टेट लि.राहुरी शाखा राहुरी फॅक्टरी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित प्रेरणा अर्थ परीवाराचे संस्थापक सुरेशशेठ वाबळे , प्रेरणा मल्टीस्टेटचे व्हा चेअरमन प्रा वेनुनाथ लांबे सर, संचालक श्री रावसाहेब पा शिंदे , प्रेरणा पतसंस्थेचे व्हा चेअरमन श्री मच्छिंद्र पा हुरुळे , आदर्श पतसंस्थेचे व्हा चेअरमन श्री आबासाहेब वाळूंज , मार्केट कमिटीचे संचालक श्री रखमाजी पा जाधव , श्री अनिलशेठ सुराणा , श्री भरत कर्जुले व कर्मचारी उपस्थित होते.
     प्रेरणा मल्टिस्टेट राहुरी येथे डॉ दादासाहेब तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करतांना प्रेरणा मल्टिस्टेट संचालक रविंद्र राऊत , प्रा.विशाल वाबळे , डॉ मधुसूदन भागवत , रविंद्र दरक , ॲड.अमोल डौले , ॲड.किरण धोंडे , जनरल मॅनेजर अनिल वर्पे , शाखाधिकारी रविंद्र हिवाळे , सोमनाथ शिंदे , आप्पासाहेब आंबेकर , जगदिश लोखंडे , आप्पासाहेब गाढे , संदिप जाधव , आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments