Type Here to Get Search Results !

आधार कार्डला अहिल्यानगरचा आधार कधी ! डॉ उषाताई तनपुरे यांनी काय केली मागणी ?

आधार कार्डला अहिल्यानगरचा आधार कधी ! डॉ उषाताई तनपुरे यांनी काय केली मागणी ?

राहुरी ( प्रतिनिधी )

अहमदनगर चे नाव अहिल्यानगर झाले आहे आणि आधार कार्डवर बहुतांश विद्यार्थी पालकांचे आधार कार्डवर अजूनही अहमदनगर नाव असल्याने अनेक पालकांना आपल्या पाल्याना प्रवेश घेण्यासाठी

अडथळा निर्माण होत असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष घालून आपल्या पाल्यास शाळा प्रवेश घेताना येणारी अडचण तातडीने मार्गी लावावी , अशी मागणी डॉ बाबुराव बापूजी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ सौ उषाताई तनपुरे यांनी केली आहे.

    आज राज्यात सर्वत्र शाळा सुरु झाल्या असून प्रत्येक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागताचे कार्यक्रम सुरु असताना राहुरी येथील एका कार्यक्रमात अनेक पालकांनी आपल्या मुला मुलींचे प्रवेश घेताना येणारी अडचण त्यांचे लक्षात आणून दिली व त्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनीही दुजोरा दिल्याने मुलांच्या शाळा प्रवेश घेताना जो अडथळा येत आहे तो त्वरित दूर व्हावा यासाठी डॉ सौ तनपुरे यांनी सदर मागणी केली आहे.

    अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी,पालक यांचे आधार कार्ड झेरॉक्स अनिवार्य आहे . केवायसीची पूर्तता करताना सर्व ठिकाणी अहमदनगर चे नाव अहिल्यानगर झाले आहे आणि आधार कार्डवर बहुतांश विद्यार्थी पालकांचे आधार कार्डवर अजूनही अहमदनगर नाव असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी अडथळा निर्माण होत आहे .

 गेल्या दोन महिन्यापासून शासन दरबारी जरी जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झाले असले तरी अद्याप आधार कार्डच्या सॉफ्टवेअर मध्ये ही दुरुस्ती झालेली नसल्याचे समजते. त्यामुळे यासंबंधी अनेक विद्यार्थी , पालक व संस्था चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही अडचण कळवली आहे.

अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगर जिल्ह्यातील आधार केंद्र यांची जबाबदारी आहे . मात्र नुकतेच अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर दुसरे उपजिल्हाधिकारी बदलून आलेले आहेत .

साधारणतः दोन महिने होत आले तरी अद्यापही या संबंधात कोणतीही कारवाई कार्यवाही न झाल्याने अहिल्यानगर नावाची अडचण विद्यार्थी , पालकांना व संस्थाचालकांना डोकेदुखी ठरत आहे . आधार चे मुख्य केंद्र यूएडीएआय कडून कोणतीही कारवाई झालेली नाही . एवढेच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने यु ए डी आय यांना या बदलाची माहिती देणे क्रमप्राप्त आहे , त्यामुळे विद्यार्थी पालकांची डोकेदुखी कायम आहे . त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये बहुतांश ठिकाणी बाधा येत आहे .७७ नवीन आधार चे किट संच अद्याप नाहीच,अहिल्या नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नगर जिल्ह्यातील ७७ नवीन आधार चे किट संच उपलब्ध झालेले आहेत . त्यातील काही राहुरी तालुक्यातील असल्याचे समजते . मात्र उपजिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत पुढील पाठपुरावा न झाल्याने हे नवीन आधार किट संच वाटप झालेले नाहीत . त्यामुळे सध्या बहुतेक ठिकाणी विद्यार्थी , पालक नागरिकांचे मोठी गैरसोय झालेली आहे . 

सध्याचे सरकार हे नागरिकांसाठी गतिमान असल्याचे बोलले जाते , मात्र ही स्थिती पाहता सरकारचा दावा फोल ठरला की काय ? अशी शंका विद्यार्थी,पालक वर्गात होत आहे . अहिल्या नगरला नव्याने जिल्हाधिकारी आलेले आहेत . या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित विद्यार्थ्यांची अडचण दूर व्हावी , अशी अपेक्षा विद्यार्थी पालक व संस्थाचालकांकडून केली जात आहे .

Post a Comment

0 Comments