ए आय तंत्रज्ञान कार्यशाळा : या माजीमंत्र्यांनी केला चाळीस शेतकऱ्यांसह एसटीने प्रवास
राहुरी ( प्रतिनिधी )
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज ए आय तंत्रज्ञान कार्यशाळेसाठी शेतकऱ्यांसमवेत एसटी चा प्रवास केला . या प्रवासाची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे बारामती आणि श्रीरामपूर येथील संस्थेच्या वतीने ए आय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आलेले आहे .यासाठी प्रमुख संस्थेच्या प्रमुख मान्यवरांनी ए आय ( कृत्रिम तंत्रज्ञान / आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) तंत्रज्ञान तज्ञांचे मार्गदर्शन होत आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर या खाजगी कारखान्याच्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेला जाण्यासाठी व्यवस्थापनाकडे मागणी केली होती . त्यानुसार , व्यवस्थापनाचे प्रमुखांनी ही तात्काळ मान्य करत शेतकऱ्या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली . आज श्रीरामपूर येथे कार्यशाळा होत आहे .
राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी उपलब्ध करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 40 शेतकऱ्यांसह आज एसटीने राहुरी ते श्रीरामपूर असा प्रवास करत कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला .
यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुक लाईव्ह करीत ए आय तंत्रज्ञान व शेतकऱ्यांसाठी पुढील काळामध्ये आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती व महत्त्व विशद केले . माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या या ए आय तंत्रज्ञानाच्या कार्यशाळेसाठी एसटीचा प्रवास नगर जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे .
केंद्र सरकारने यंदाचे वर्ष ए आय तंत्रज्ञानाचे घोषित केलेले आहे . त्यानुसार महाराष्ट्रासह देशभरामध्ये हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी विविध उपक्रम केले जात आहे . त्यातच श्रीरामपूर येथे या कार्यशाळेसाठी राहुरी तालुक्यातील तनपुरे यांनी शेतकऱ्यांसह या कार्यशाळे साठीचा सहभाग चर्चेचा ठरला आहे .





Post a Comment
0 Comments