दिंडीतील वारकरी महिलेचा राहुरीत हृदयविकाराने मृत्यू
राहुरी ( प्रतिनिधी )
पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंडी सोहळ्यातील वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना राहुरीत शुक्रवारी 20 जून रोजी रात्री घडली .
या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी चे राहुरीत शुक्रवार दि. 20 जून रोजी सायंकाळी आगमन झाले . या पालखी सोहळ्यातील एका दिंडी मधील वारकरी शहरातील एका वस्तीवर मुक्कामाला थांबले होते . त्यातील राधाबाई रामदास चव्हाण ( वय 55 ) राहणार - अंजनेरी , तालुका त्र्यंबकेश्वर (जिल्हा -नाशिक ) यांचा रात्रीच्या वेळी हृदयविकाराने मृत्यू झाला .
यावेळी या दिंडीतील सहभागी असणारे अंबादास चव्हाण , मधुकर खांडबाले , अशोक गवळी , यांनी संबंधितांना ही माहिती कळवून डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी वारकरी महिलेची तपासणी केल्यानंतर मृत जाहीर घोषित केले .
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा मधील वारकरी महिलेचे महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे .


Post a Comment
0 Comments