Type Here to Get Search Results !

सात्रळ मध्ये महावितरण कडून जनजागृती अभियान संपन्न

सात्रळ मध्ये महावितरण कडून जनजागृती अभियान संपन्न

सात्रळ :- सुनील सात्रळकर ( पत्रकार )

महाराष्ट्र राज्याच्या "महावितरण" वीज कंपनी च्या "प्रकाशित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र"घोषवाक्य जनजागृती तसेच महावितरण च्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त सात्रळ येथेआठवडे बाजारात महावितरण च्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी जणजागृती अभियान राबविले.

 या संकल्पनेनुसार दि.०१ ते ०६ जून २०२५ या कालावधीत "वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह" साजरा करण्यात येत आहे ,या अभियाना नुसार वीज ग्राहकांना वीज वापर करताना असणाऱ्या सुरक्षा मार्गदर्शक माहितीपत्रक वाटण्यात आले. त्या अभियान मोहीम जाणसामान्यात माहिती होण्यासाठी सात्रळ येथील महावितरण कक्ष कार्यालयातील सहायक अभियंता श्री . डि .जी. वर्पे व जनमित्र श्री.वैभव आंबेकर , श्री. सचिन चव्हाण श्री. नितीन जेजुरकर , श्री . सचिन ब्राम्हणे, श्री.गोरक्षनाथ अंत्रे , महेंद् अनाप , गोरख अनाप , सुनिल जगताप , बाळासाहेव बागुल, संदीप पर्वत,निलेश राऊत यांनी सात्रळ येथे मंगळवारी भरलेल्या आठवडे बाजारात फिरून लोकांना विद्युत सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले व जनजागृती अभियान राबवून माहिती दिली . सदर अभियानास कार्यकारी अभियंता श्री. अजय भंगाळे साहेब व उपकार्यकारी अभियंता श्री.अजय धामोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments