Type Here to Get Search Results !

राहुरीतील सहा ठिकाणचे वाळूलिलाव होणार ; सुधारित वाळूधोरण निवडणुकीसारखे बदलते - ग्रामस्थांचा विरोध झाला तर लिलाव होणार काय ?

राहुरीतील सहा ठिकाणचे वाळूलिलाव होणार ; सुधारित वाळूधोरण निवडणुकीसारखे बदलते - ग्रामस्थांचा विरोध झाला तर लिलाव होणार काय ?



राहुरी ( प्रतिनिधी )

राज्यातील शिंदे फडणवीस शासन काळात राज्यातील वाळू धोरण फसल्यानंतर आता सुधारित वाळू धोरण जाहीर झाल्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा वाळू साठयांचे ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार असून त्यातील सर्वाधिक सहा वाळू साठे राहुरीत आहेत. त्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे .

       येत्या 9 जून 2025 रोजी शासनाच्या सुधारित वाळू धोरणानुसार वाळू साठ्यांचे लिलाव होत आहेत . 19 मे पासून जिल्ह्यातील 12 वाळू ( रेती डेपोचे ) ऑनलाइन पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे . दोन जून 2025 पर्यंत या ऑनलाइन लिलावात सहभागी होण्यासाठी संबंधित व्यक्ती व संस्था यांना नोंदणी करण्यात येणार आहे . नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती किंवा संस्था यांनी वाळू लिलावाच्या रकमेच्या पंचवीस टक्के इसारा जिल्हा गौण खनिज विभागाकडे जमा करणे बंधनकारक असणार आहे .

 दरम्यानच्या काळात वाळू लिलाव घेण्यासाठी तांत्रिक लिफाफा ही तयार करावयाचा आहे चार ते सहा जून लिलाव घेण्यासाठी दाखल ऑनलाइन निविदा जाहीर होईल . यात पात्र निविदा यांची छाननी करण्यात येणार आहे . ही छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र निविदा धारकांना 9 जून रोजी ऑनलाइन पद्धतीने वाळू साठा इ लिलावात सहभागी होता येईल , अशी माहिती जिल्हा गौण खनिज विभागा कडून जाहीर झाली आहे .

नगर जिल्ह्यातील नागलवाडी ( कर्जत तालुका ) , तास - दोन ठिकाणी ( पारनेर तालुका ) तसेच राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्रातील देसवंडी येथील चार वाळू साठे तर प्रवरा नदी पात्रातील जातप येथील दोन वाळू साठे यांचा या लिलाव प्रक्रियेत समावेश आहे . देसवंडी येथे येथील नदीपात्रातील 7 हजार 420 ब्रास तर जातप येथील दोन साठ्यांमधील 7 हजार 155 ब्रास वाळू लिलाव अपेक्षित आहे .

 वाळू लिलावात निविदा भरून सहभागी होणाऱ्यांना संगनमत करून शासन महसूल बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा तर देण्यात आला आहेच . याशिवाय वाढीव बोली लावल्यानंतर एकदा लिलावात सहभागी होऊन दुसऱ्यांदा बोली न लावणाऱ्यांना राज्यभरात काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही या विभागांना दिला आहे . या वाळू लिलावाला अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्याने या वाळू साठे यांच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेल्या राहुरी महसूल विभागाला यंदाच्या वर्षी महसुली वसुलीत 75% वसुली झाल्याने शंभर टक्के वसुलीची परंपरा खंडित झाल्याचे चर्चा महसूल विभागाच्या वर्तुळात सुरू आहे . मुळा , प्रवरा नदी पात्रातील वाळूची मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरूच आहे . त्यातच आता वाळूचे लिलाव होणार असल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे .


Post a Comment

0 Comments