Type Here to Get Search Results !

मुळाधरणाचा यंदाच्या वर्षी ऐतिहासिक विक्रम हुकला ; धरण अनेक वर्षात पहिल्यांदा जूनमध्येच भरले असते निम्मे

मुळाधरणाचा यंदाच्या वर्षी ऐतिहासिक विक्रम हुकला ; धरण अनेक वर्षात पहिल्यांदा जूनमध्येच भरले असते निम्मे 

राहुरी ( प्रतिनिधी )

1972 ला स्थापन झालेल्या व नगर जिल्ह्याची जलसंजीवनी ठरलेला मुळा धरणाचा दरवर्षी काही ना काही विक्रम ठरतो , यंदाच्या वर्षी मुळा धरणाचा एक विक्रम मात्र हुकलेला आहे . 30 जून पूर्वी मुळाधरण निम्मे भरण्याचा !

गेल्या 30 वर्षात किंबहुना अधिक कालावधी मध्ये जून महिन्यामध्ये मुळा धरण निम्मे 50% क्वचितच भरलेले आहे . यंदाच्या वर्षी जूनच्या अंतिम सप्ताह पर्यंत धरणात 45% अधिक साठा झाला होता . मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने व जून अखेर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने यंदाच्या वर्षी जूनमध्ये मुळा धरण निम्मे भरण्याचा विक्रम हुकला आहे . एक जुलै 2025 रोजी मुळा धरण साठा ५०% टक्क्यांचा टप्पा पार करेल .



गेल्या पंचवीस ते तीस वर्षांच्या काळात मुळा धरण 13 वेळा जुलै महिन्यात निम्मे भरलेले आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये धरणसाठा 50 टक्क्यांपर्यंत पोहोचायला ऑगस्ट महिना उजाडलेला आहे . यंदा जून महिन्यातच निम्मे भरण्याचा विक्रम हुकल्याने मुळा धरण मंगळवारी एक जुलैला निम्मे भरेल भरत आहे .

यापूर्वी 2006 , 2007 , 2008 ला अनेक विक्रमांनी गाजलेले आहे . धरणातून मुळा नदीपात्रात जायकवाडी कडे तब्बल 44 हजार क्युसेकने पाणी सोडण्याचा विक्रम तर पाणलोट क्षेत्रातून तब्बल 55 ते 60 हजार पाण्याची आवक होत असल्याचा विक्रम झालेला आहे . 2004 या वर्षी मुळा धरणात नीचांकी 4 हजार 250 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचाही विक्रम सर्वश्रुत आहे . नगर जिल्ह्याची जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या मुळा धरणाच्या सध्याच्या पाणी पातळीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे .

Post a Comment

0 Comments