आ...बा...बा...बाबा राहुरीत तिघांकडून पोलीस पथकाने केल्या बनावट लाखो रुपयांच्या नोटा: दोनशे आणि पाचशे रुपयांचा समावेश ; पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे स्वागत
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी पोलिस पथकाने काल मध्यरात्री शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली. दोन लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलिस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर राहुरीकडे येत आहेत.
हवालदार सुरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी पप्पु ऊर्फ प्रतीक भारत पवार, वय ३३ वर्ष, रा. अर्जुन नगर, ता. करमाळा, जि. सोलापुर, तसेच राजेंद्र कोंडीबा चौघुले, वय ४२ वर्षे, तात्या विश्वनाथ हजारे, वय ४० वर्षे, दोघे रा. पाटेगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा रजि. नं. ७२४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८०, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी २०० व ५०० च्या बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते. त्यांनी नोटा कोठून आणल्यात, यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत. या बाबतचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संदिप मुरकुटे हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उप निरीक्षक संदिप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे, नदिम शेख, सतिष कुऱ्हाडे, अंकुश भोसले, चालक शकुर सय्यद आदि पोलिस पथकाने केली.



Post a Comment
0 Comments