रात्री हॉटेल सुरू ठेवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघा पोलिसांवर अँटी करप्शनची कारवाई
अहिल्यानगर ( विशेष प्रतिनिधी )
हॉटेल रात्रीपर्यंत चालू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडून पंधराशे रुपये लाचेची मागणी करून स्वीकारताना पाथर्डी च्या दोन पोलिसांना अँटी करप्शन च्या नाशिक युनिटच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले .
यातील एकाला अँटीकरप्शन च्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे माहिती समजली आहे . पाथर्डी येथे तक्रारदाराचे मिसळ चे हॉटेल असून सदर पोलिसांनी हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्यासाठी लाच द्यावी लागेल असे सांगितले . तक्रारदाराने अँटी करप्शन कडे तक्रार केल्यावर पथकाच्या पंचासमोर सदर पोलिसाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले . या पोलिसाच्या अन्य साथीदारांचाही यात सहभाग असल्याने अँटी करप्शन च्या नाशिक युनिट कडून पुढील कारवाई सुरू आहे . नगर जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे .


Post a Comment
0 Comments