मुळा धरणाकडे तब्बल 21 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू
राहुरी ( प्रतिनिधी )
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी आनंदाची बातमी ! यंदाच्या हंगामात प्रथमच धरणाकडे
आज 21 हजार 300 क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे .
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मान्सून ने प्रथमच जून महिन्याच्या मध्यावर दमदार हजेरी लावल्याचे चित्र आहे . मे महिन्यातच मुळा धरणात जवळपास अर्धा टीएमसी पाणी जमा झालेले आहे .
आज सकाळी मुळा धरण पाणीपातळी १७७२ फूट इतका असून धरण साठा 9 हजार 350 दशलक्ष घनफूट इतका ( 36 टक्के ) इतका आहे . मुळा धरणाकडे आज सकाळी कोतुळकडील लहित खुर्द येथे साडेचार मीटरला 21 हजार 376 क्युसेकने होती . पिंपळगाव खांड धरण आज ओव्हरफ्लो होत असून मुळा धरणाकडे दमदार पाण्याची आवक सुरू झाल्याने लाभक्षेत्रात राहुरी , नगर , पाथर्डी , शेवगाव , नेवासा तालुक्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे .




Post a Comment
0 Comments