Type Here to Get Search Results !

राहुरी शहरात भर वस्तीत लिंबाचे झाड कोसळले ; सुदैवाने हानी नाही

राहुरी शहरात भर वस्तीत लिंबाचे झाड कोसळले ; सुदैवाने हानी नाही

राहुरी  ( प्रतिनिधी )

ग्रामीण रुग्णालया शेजारी लिंबाचे झाड काल सोमवारी सायंकाळ नंतर कोसळले . निवासी भाग असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही . वाळवी लागल्याने लिंबाचे झाड पडले असून काही काळ रस्ता बंद झाला .

दरम्यान विजांच्या तारांवर झाड पडल्याने काल सायंकाळपासून शहराच्या अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे .महावितरणचे कर्मचारी पथक दुरुस्तीच्या कामाला लागले आहे . शहरातील नगरपालिका पाठीमागील ग्रामीण रुग्णालया जवळचे हे लिंबाचे झाड काल रात्री अचानक कोसळले . आजूबाजूला रहिवासी क्षेत्र असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली . बाजूलाच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती भवन देखील आहे . विजेच्या तारांवर झाडाचा भाग पडल्याने काल सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे .
आज सकाळी महावितरणचे कर्मचारी विजेचा खांबा वर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे .शहरात अनेक ठिकाणी  जुनी झाडे व त्यांच्या फांद्या या अडथळा  ठरत आहेत . राहुरी नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी शहरातून केली जात आहे .

Post a Comment

0 Comments