बँकेसमोर लावलेल्या दुचाकीच्या डीक्कीतून पैसे चोरणाऱ्या टोळीला केले राहुरी पोलिसांनी जेरबंद - मुद्देमाल जप्त ; आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरीतील स्टेट बँक तसेच अन्य ठिकाणी बँक , पतसंस्था समोर खातेदारांच्या वाहनातून पैसे चोरणाऱ्या टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली आहे .
याप्रकरणी आंध्र प्रदेशातील तिघांना संभाजीनगर येथे पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून सात हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे .
दरम्यान , राहुरी न्यायालयाने या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडीचे आदेश दिले आहे . दिनांक 28/05/2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं - 610/2025 बी एन एस कलम 305(ब) प्रमाणे फिर्यादी सोमनाथ लक्ष्मण ढसाळ रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी यांचे दि. 28/05/2025 रोजी दुपारी 03:45 वाजे सुमारास स्टेट बँक शाखा राहुरी समोरून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राहुरी पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज,तांत्रिक विश्लेषण व मा. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने, संशयित आरोपी
1) पितला देवाधनम नागय्याह वय-35,
2) अवुला आमोसे थिप्पाइह वय-37,
3) कुणचाला चिन्ना रवी वय.37 रा.सर्व आंध्र प्रदेश
यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्यांना दिनांक 05/06/2025 रोजी अटक करून मा.न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. रिमांड कालावधीमध्ये आरोपींकडून त्यांनी चोरलेले साठ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले असून,पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोहेकॉ /संदीप ठाणगे,विजय नवले,पोलीस कॉन्स्टेबल-जयदीप बडे, योगेश आव्हाड नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर यांनी केलेली आहे.



Post a Comment
0 Comments