Type Here to Get Search Results !

' काटा फुटला ' नवे कोरे गाणे रसिकांना भुरळ घालणार

 ' काटा फुटला '  नवे कोरे गाणे रसिकांना भुरळ घालणार



अहिल्यानगर   ( प्नतिनिधी )

 विनोदाचे बादशहा आणि डबल मिनिंगसाठी चित्रपट सृष्टीत अव्वल ठरलेले दादा कोंडके यांच्या ९० च्या दशकातील प्रेक्षकांना खळखळून हसवणारे त्यांचे डबल मिनिंग असलेले गाणे प्रेक्षकांनी अक्षरशःडोक्यावर घेतले होते .

 दादा त्या गाण्यांमुळे रातोरात सुपर डुपर रेकॉर्ड करून आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये मानाचा स्थान पटकावणारा मराठमोळा अभिनेता ठरला निर्माता दिग्दर्शक अभिनेता ते गीतकार असे सर्व गुण संपन्न असणारा दादा आपल्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत कधी झाला हे कोणाला कळलंच नाही


त्यांच्या जाण्याने जी डबल मिनिंग गाण्यांची उणीव व प्रेक्षकांना हसवण्याचे काम व दादांची प्रेरणा घेऊन अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी आपल्या नवीन येणाऱ्या "काटा फुटला,"डबल मिनिंग गाण्यामधून प्रेक्षकांना नक्कीच दादांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही व प्रेक्षकांचे मनोरंजन देखील होईल असा विश्वास अभिनेते प्रमोद पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितला .

यामध्ये अभिनेत्री जया कोरे व बालकलाकार स्वराज साबळे यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे हे विशेष . या गाण्यासाठी कॅमेरामन:आबा निर्मळ, गायिका:ऐश्वर्या जाधव,गीतकार: रंगनाथ का साळवे ,संगीतकार: मधु रेडकर, विशेष सहकारी ज्ञानदेव शिंदे,अविनाश पवार, अभिजीत साबळे,आदींनी आपल्या भुमिका निभावल्या आहे.

काटा फुटला मराठी डबल मिनिंग सॉंग लवकरच आपल्या भेटीस आल्याने प्रेक्षक त्यास डोक्यावर घेईल असा विश्वास दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments