राहुरीत रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांचे डोके ठिकाणावर आहे का ? वाहनचालकांसह नागरिकांचा संतप्त सवाल
राहुरी ( प्रतिनिधी )
गेल्या काही काळापासून जगप्रसिद्ध धार्मिक क्षेत्र साईबाबांची शिर्डी , शनिशिंगणापूरला जोडणाऱ्या राहुरी भागातील सर्वच रस्त्यांची भयानक स्थिती झालेली आहे . यातच प्रसिद्ध राहुरी शहरातील राहू केतू के साथ शनी मंदिर या नवी पेठ येथील रस्त्याची ही अशीच चाळण झालेली आहे .
एवढेच नव्हे तर शहरातील सर्वच रस्त्यांसह नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 अ हा रस्ता तर देशभरामध्ये पूर्णपणे बदनामी कारक रस्ता म्हणावा लागेल .
गेल्या वर्षभरात नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या कडेला गॅस पाईप लाईनमुळे रस्त्याच्या खोदकामामुळे ओबड धोबड रस्ता झाला .
त्यातच त्यावर गॅस पाईपलाईन कंपनीने काही भागात मुरूम टाकला तर बहुतांश भागात कडेला असणाऱ्या काहींनी मुरूम टाकला . राहुरी शहरात महाराष्ट्र शासनाची एसटीपी योजनेची ( सांडपाणी योजना) कामे सुरू असल्याने प्रत्येक रस्त्याच्या मध्यभागी
रस्ता खोदून त्यात एसटीपी चे पाईप टाकून त्यावर मलमपट्टी करून काम सुरू आहे . हे काम सध्या अंतिम टप्प्यात असले तरी राहुरी शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे ओबडधोबड , काँक्रीटचे रस्ते मुरमाड व माती असणाऱ्या रस्त्यांमुळे वाहन चालकांसह विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्गाला ये जा करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
शहरातील बहुचर्चित असा एसटीपी प्रोजेक्ट अर्थात सांडपाणी प्रकल्प हा जानेवारी 2025 पर्यंतच होणे अपेक्षित होते , त्या ठेकेदाराचे काम अजूनही सुरू असून त्यावर काही कारवाई झाली की नाही ? हे कोणालाही माहिती नाही !! असे असतानाही या प्रकल्पाच्या राहुरी शहरातील कामाला जुलै महिना निम्मा उलटला तरी ती कामे सध्या सुरू असून परिणामी पाईपलाईन पूर्ण झालेल्या रस्त्यांवर जी ठेकेदारांच्या लोकांकडून झालेली रस्त्याची दुर्दशा आहे ती कायम आहे .
गेल्या दोन वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने या ठेकेदारांची कामाचे 3:13 व 9 12 असे झाले दिसत आहे. त्यामुळे यांच्यावर कोणाचा वचक आहे ? हे कोणाच्याही लक्षात येत नसल्याचे चित्र आहे .
त्यामुळे विद्यार्थी पालक महिला वर्गासह राहुरीतील नागरिकांकडून या ठेकेदारांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा संतप्त सवाल करण्यात येत आहे . याकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न मात्र कायम आहे .




Post a Comment
0 Comments