Type Here to Get Search Results !

जेष्ठनेते मा.खा. प्रसाद तनपुरेंच्या वाढदिवसाला नितीन गडकरी लिखित पुस्तकाची भेट

जेष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरेंच्या वाढदिवसाला नितीन गडकरी लिखित पुस्तकाची भेट

राहुरी ( प्रतिनिधी )

      नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी विविध झाडांची रोपे , संस्थेसाठीचा आवश्यक वस्तू भेट दिल्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लिखित पुस्तकही भेट दिले .

           आमदार , खासदार राहिलेले प्रसाद तनपुरे अंदाज समितीचे अध्यक्षपद भूषविलेले हे त्यांच्या दूरदृष्टीमुळे सर्वत्र परिचित आहेत . अंदाज समितीचे अध्यक्षपदावर असताना त्यांच्या कामाचे कौतुक केले जात होते .

                 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना प्रसाद तनपुरे यांच्या कामाचे त्यांनीही कौतुक केले होते . तनपुरे यांनी मंत्री गडकरी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना आपल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले होते , मात्र ते राहून गेले .

                         सध्या नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचा विषय प्रलंबित आहे. त्याची चर्चा सुरू असतानाच नुकतेच मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेले संघातील मानवी व्यवस्थापन एका स्वयंसेवकाच्या नजरेतून हे पुस्तक प्रकाशित केले . त्याच्या प्रती राज्यभर व बाहेर विक्री झाल्या . माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पूर्वीपासूनचे संबंध सर्वश्रुत आहेत . ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे माजी खासदार तनपुरे यांच्याशी असलेले संबंध आणि मंत्री नितीन गडकरी यांचे असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाशी संबंध याच्या पलीकडे तनपुरे - गडकरी यांचे वेगळे संबंध आहेत . माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन गडकरी लिखित पुस्तक त्यांना वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे .

Post a Comment

0 Comments