Type Here to Get Search Results !

युवतीने वाचवले निष्पाप गोवंशाचे प्राण ; पोलीस निरीक्षकही आले धावून

युवतीने वाचवले निष्पाप गोवंशाचे प्राण ; पोलीस निरीक्षकही आले धावून 

राहुरी ( प्रतिनिधी )

दिनांक 2025 रोजी सुमारे दोन वाजेच्या सुमारास युवती नामे ऋतुजा कैलास कांबळे वय 25 राहणार निर्मळ पिंपरी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या पुणे येथून ताहाराबाद मार्गे कानडगाव कडे जात असताना

ताहाराबाद ते कानडगाव दरम्यानच्या घाटामध्ये जंगलात एक (दोन ते तीन दिवस वयाचे) गिर गायीचा गोऱ्हा मरणासन्न अवस्थेत काटेरी झुडपात कुणीतरी सोडून दिलेचे त्यांच्या निदर्शनात आले.

त्यांनी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्या वासराला बाहेर काढून पाणी पाजून त्याला तेथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी घेण्याबाबत विनवणी केली असता तेथील शेतकऱ्यांनी नकार दिल्याने त्या वासराचे काय करायचे अशा विवंचनेत सदर युवती असताना तेथून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व सौ जया संजय ठेंगे हे जात असताना त्यांनी वासरू दुचाकी वर का बर ठेवलेले आहे याची विचारपूस करता त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला व सदर वासराला कुठेतरी गोशाळेमध्ये सोडण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. 

वासराचे वय पाहता ते चारा खात नसल्यामुळे त्याला गोशाळेमध्ये चारा खायला लागेपर्यंत कुणी घेत नाही. त्यामुळे सदर वासराला राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून ठाणे अमलदार बबन राठोड यांना कल्पना देऊन सदर वासरू ज्याचे कुणाचे असेल त्याने घेऊन जावे असे आव्हान केले. तसेच ते चारा खायला लागेपर्यंत गोशाळेत प्रवेश मिळत नसल्याने त्याला तोपर्यंत सांभाळण्याची तयारी दर्शविली. 


तरी राहुरी पोलिसांच्या वतीने आव्हान करण्यात येते की अशा प्रकारे लहान वासरे धोकादायक स्थितीत कुणीही सोडू नये. वासरांचा सांभाळ करणे शक्य नसल्यास परिसरातील गोशाळेंना आवाहन करून त्यांच्या ताब्यात सांभाळ करण्यासाठी द्यावे.

Post a Comment

0 Comments