Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय महामार्गावर राहुरीत पुन्हा चार चाकी पलटी ; अनर्थ टळला

राष्ट्रीय महामार्गावर राहुरीत पुन्हा चार चाकी पलटी ; अनर्थ टळला

राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी शहरालगत नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग मार्गावर आज पहाटेच्या सुमारास मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाला .

वाहतूक व वर्दळ नसल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला .

सफरचंदाची खोके घेऊन जाणारा माल ट्रक हिमाचल प्रदेशातून शिर्डी मार्गे कर्नाटकातील बंगलोर कडे चालला होता. राहुरी लगत गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर आज पहाटेच्या सुमारास पलटी झाला .

रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाल्याचा अंदाज आहे.

रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ 112 क्रमांकाला संपर्क करत घटनास्थळी धाव घेतली . एकेरी वाहतूक वळविण्यात येऊन सकाळपर्यंत मालट्रक मधील सफरचंदाचे खोके काढून जेसीबी ला पाचारण करण्यात आले होते . घटनास्थळी गर्दी झाली होती .
यापूर्वीही याच ठिकाणी वाहने पलटी होण्याचे घटना घडलेल्या आहेत . या ठिकाणी असणारा स्पीड ब्रेकर सूचना फलक नसल्याने व दिशादर्शक नसल्याने वाहन चालकांना स्पीड ब्रेकर व मोठे वळण असल्याने स्पीड ब्रेकर असल्याचाअंदाज येत नसल्याने अपघात घडतात . या रस्त्याचा वापर वाहन चालकांसह विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक , महिला करतात . स्पिड ब्रेकर व्यवस्थित नाहीत . त्यावर बाजूला झेब्रा क्रॉसिंग नाही , पांढरे पट्टे नाहीत , रेडियम देखील नाहीत . ते असणे आवश्यक आहे . शिवाय वाहन चालक वेगाने वाहने चालवत असल्याने नियंत्रण सुटण्याची शक्यता असते . 
शहरातील बस स्थानक चौकात मल्हारवाडी रोड ते नवी पेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची व नागरिकांची वर्दळ असते.  या ठिकाणीही झेब्रा क्रॉसिंग स्पीड ब्रेकर होणे अत्यावश्यक आहे . आज पुन्हा चार चाकी वाहन पलटी झाल्याने ठीक ठिकाणी सूचनाफलक लावाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments