कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे राहुरीत चक्काजाम आंदोलन यशस्वी
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरीत प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने शेतकऱ्याचे कैवारी बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या कर्जमाफी सह इतर मागण्यासाठी महाराष्ट्रासह राहुरीत ही चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे , सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव तुपे , राष्ट्रीय समाज पक्ष यांनी चक्काजाम आंदोलनास पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले .
यावेळी प्रहार जनशक्ती प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी भाषणात म्हटले की, बच्चुभाऊ कडू गेली सहा महिन्यापासून वेगवेगळे आंदोलन करत आहेत. यात सात दिवसाच्या उपोषण केला आहे 140 किलोमीटर उतारा कोरा पायी आंदोलन केला आहे. सरकारने आश्वासन देऊनहीशेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे . शेतकऱ्याचा कोरा उतारा झाला पाहिजे. पेरणी ते कापणी खर्च एम आर इ जी एस अंतर्गत करण्यात यावा. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाले पाहिजे. दिव्यांगाला घरकुलचा लाभ मिळाला पाहिजे.
यासह इतरही मागण्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आले .
उपस्थितांचे आभार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे पाटील यांनी केले . यावेळी जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख , प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे , उपाध्यक्ष विजय म्हसे , शहराध्यक्ष जुबेर मुसानी , संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी , तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, शोभा कडू , सोनाली खडके आदी उपस्थित होते .



Post a Comment
0 Comments