Type Here to Get Search Results !

मुळाधरणाकडे तब्बल 30 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू

मुळा धरणाकडे तब्बल 30 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू

राहुरी ( प्रतिनिधी )

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी ब्रेकिंग न्यूज ! मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाकडे आज सकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे ,

परिणामी धरण साठ्यात दोन दिवसात झपाट्याने पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे .

                  औषधासाठी संपर्क - कविता मैड 

                   ( मोबाईल नंबर 9325402032 )

मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रातून ललित खुर्द येथे मुळा नदीतून धरणाकडे आज सकाळी सहा वाजता 20 हजार 428 क्युसेकने पाण्याची आवक होती. मुळा नदी चार मीटरने दुथडी भरून वाहत होती . सकाळी साडेआठ नंतर तब्बल एक मीटरने पाण्याच्या प्रवाहात वाढ होत 29 हजार क्युसेकने धरणाकडे पाण्याची आवक सुरू होती . गेली काही दिवस पाणलोटक्षेत्रात पाऊस झाला नसल्याने चिंता वाढली होती .

                 औषधासाठी संपर्क - रेणुका उदावंत 

                    (मोबाईल नंबर - 94 230 17 275 )


आज सकाळी धरणसाठा 22 हजार 752 दशलक्ष (87%) घनफूट इतका होता . कोतुळ येथे 37 मिलिमीटर , मुळा नगर येथे नऊ मिलिमीटर तर राहुरीत सहा मिलिमीटर पाऊस झाला आहे .
जलसंपदा विभागाचा पूर नियंत्रण कक्ष धरण स्थितीवर लक्ष देऊन आहे .

        कोतुळकडील मुळा नदीचे सध्याचे दृश्य  ( सौजन्य - अनिल पाठक , कोतुळ )


जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता पि व्ही पाटील तर शाखा अभियंता राजेंद्र पारखे पाणी पातळीवर लक्ष देऊन आहेत.  मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील राहुरी नेवासा नगर पाथर्डी शेवगाव तालुक्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.  दरम्यान , राहुरी शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कमी अधिक प्रमाणात रिमझिम दिसून येत आहे .
मुळा धरण साठा ९० ते ९५ टक्क्यापर्यंत जमा करून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मुळा नदी पात्रात सोडण्यात येईल अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments