भंडारदरा धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडले
राहुरी ( प्रतिनिधी )
15 ऑगस्ट रोजी चा विक्रम हुकलेल्या भंडारदरा धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याने आज धरणातून विक्रमी 20 हजार 700 क्युसेकने निळवंडेकडे पाणी झेपावले तर निळवंडे तूनही प्रवरा नदीपात्रात 9 हजार 715 क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
औषधासाठी संपर्क - कविता मैड
मोबाईल नंबर 93 25 40 20 32
औषधासाठी संपर्क - रेणुका उदावंत
मोबाईल नंबर - 94 230 17 275
दरवर्षी 15 ऑगस्ट पर्यंत भंडारदरा ओव्हरफ्लो होत असे , यंदा हा विक्रम झालाच नाही . मात्र कालपासून भंडारदरा धरण क्षेत्रात व घाट माथ्यावर पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने धरणे ओव्हर फ्लो होत आहेत .
आज सकाळी भंडारदर्याचा साठा 10 हजार 896 98.70% झाला तर निळवंडे चा साठा 7 हजार 189 86.41% झाला. प्रवरा नदी भरून वाहत आहेत आज सकाळपर्यंत घाटघर 160 , रतनवाडी 170 , पांजरे 105 तर भंडारदरा येथे 102 मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे .
इकडे गोदावरी नदी देखील दुथडी भरून वाहत असून नांदूर मध्यमेश्वर येथे गोदावरी नदीतून जायकवाडी कडे सहा हजार तीनशे दहा क्युसेकने आवक सुरू होती . आज दुपारनंतर गोदावरीचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे . दरम्यान धरणांच्या लाभक्षेत्रातही अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत .



Post a Comment
0 Comments