Type Here to Get Search Results !

मुळाधरणाकडे 8 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग- विसर्ग वाढवत 5 हजार क्युसेकने ; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

मुळाधरणाकडे 8 हजार क्युसेकने पाण्याची आवक - विसर्ग  5 हजार क्युसेकने ; नदीकाठी सतर्कतेचा इशारा


राहुरी  ( प्रतिनिधी )

मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला आला असून रात्री नऊ वाजता धरणातून 5 हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे .

नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा धरणात आज सकाळी मुळा धरणसाठा 25 हजार 500 दशलक्ष घनफूट ( 97% ) झाला तर पाण्याची पातळी 1811. 05 इतकी होती. धरणाकडे पाणलोट क्षेत्रातून 3 हजार 822 क्युसेकने आवक सुरू होती . सध्या धरणाची पाणी पातळी व धरण स्थितीकडे पूर नियंत्रण कक्ष सज्ज झालेला आहे .

        जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील , मुळा. पाटबंधारे. विभागाचे  उपविभागीय  अभियंता  पी. व्ही. पाटील , शाखा अधिकारी  राजेंद्र पारखे व पूर नियंत्रण  कक्ष  सध्या कार्यरत  आहे .
दुपारनंतर धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवक पाहता रात्री नऊ वाजता 




        मुळा नदीपात्रात दुपारी 2 हजार 500 क्युसेकने होणारी आवक वाढवत रात्री नऊ वाजता ती 5 हजार क्युसेकने करण्यात आली आहे .
जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे . बुधवारी सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात सुरू होणार असून गणेशोत्सव काळात हमखास मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो , असा प्रघात असल्याने व याचकाळात मुळा धरणाच्या नजीकच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने मुळा धरणाचा पूर नियंत्रण कक्ष सज्ज झाला आहे .

Post a Comment

0 Comments