Type Here to Get Search Results !

२०२७ च्या कुंभमेळा अगोदर रस्ता पूर्ण करा ; रस्ताकामात गुणवत्ता राखा अन्यथा गाठ

२०२७ च्या कुंभमेळा अगोदर रस्ता पूर्ण करा ; रस्ताकामात गुणवत्ता राखा अन्यथा गाठ रस्ता दुरुस्त कृती समितीशी - देवेंद्र लांबे

रस्ता कामात कोणी विघ्न आणल्यास कृती समिती बंदोबस्त करेल. _ देवेंद्र लांबे


राहुरी   ( प्रतिनिधी )

नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी भारत कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. या प्रसंगी रस्ता दुरुस्त कृती समितीचे देवेंद्र लांबे पाटील,सुनील विश्वासराव,बाळासाहेब लोखंडे,प्रशांत मुसमाडे आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सध्या नगर ते शिर्डी दरम्यान रस्त्याचे पाणी जाण्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणावर नाल्या बनविण्याचे काम चालू आहे. परंतु सबंधित नाल्या बनवताना कामामध्ये गुणवत्ता नसल्याने सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.


रस्ता कामात गुणवत्ता न राखल्यास गाठ रस्ता दुरुस्ती कृती समितीशी आहे असे देखील ठणकावून सांगण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला नाली बांधल्यानंतर साईडपट्टी साठी रस्ता नसणार हे निदर्शनास आणून दिले.

येत्या २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे, कुंभमेळा साठी देशासह विदेशातून भाविक येणार आहेत.नाशिक जवळ नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र आहेत.याच ठिकाणी मोठ्याप्रमांवर भाविकांची वर्दळ वाढणार आहे.त्यामुळे लवकरात लवकर नगर शिर्डी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. लवकरच रस्त्याच्या त्रुटी बाबत भारतीय राज्य महामार्गावर यांचे अधिकारी सोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे श्री.लांबे पा.म्हणाले.

राहुरी कारखाना दरम्यान कारखाना चालू झाल्यानंतर ऊस वाहतुकीची साधने,महाविद्यालयातील विद्यार्थी,नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.रस्त्यांमध्ये एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास पूर्ण रस्त्यावर वाहतूक ठप्प होणार आहे.त्यासाठी रस्त्याच्या कडेने नालीचे कठडे करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच मागील ठेकेदार कंपनीने रस्त्याचे काम करतांना चांगल्या प्रतीचे डांबर न वापरल्यामुळें नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात खराब झालेला आहे.त्यामुळे सरकारचा पैसा म्हणजेच जनतेचा पैसा निर्थक वाया जात असल्याचे सांगण्यात आले.

तसेच या प्रसंगी सबंधित कंपनीचे श्री.धर्मेंद्र यांना रस्त्याचे काम उच्च प्रतीचे व लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली.गेल्या ७ते८ वर्षांपासून रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समितीच्या माध्यमातून लढा देत आहोत, सबंधित कामात कोणी विघ्न आणण्याचे काम करत असेल तर नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समित्या सदस्यांना कळवावे कृती समितीचे सदस्य अशा बहाद्दरांचा बंदोबस्त करतील असे देवेंद्र लांबे पाटील यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments