सात महिन्यांत 40 मूळमालकांचे चोरी गेलेले मोबाईल मिळाले परत पहा बातमी
राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील इसमानचे हरवलेले मोबाईल राहुरी पोलिस स्टेशन शोध पथकाने शोधून मूळ मालकास केले परत
राहुरी ( प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिकत अशी की, राहुरी पोलिस ठाणे येथे काही इसमांनी त्यांचे मोबाईल हरवल्याची नोंद केली होती, सदर हरवलेले मोबाईल हे शोधण्याबाबत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शोध पथकास आदेशित केले होते,
त्यावरून शोध पथकाने दाखल नोंदीवरून मोबाईलची माहिती घेऊन तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले आणि शोध पथकास जानेवारी 2025 पासून आजपावेतो एकूण 40 मोबाईल शोधन्यात यश आले असून त्यातील काही मोबाईल हे त्यांच्या मूळ मालकास
परत करण्यात आले आहे तसेच इतर शिल्लक मोबाईल मालक यांच्याशी संपर्क करून मोबाईलची खात्री करून परत देन्याची कारवाई चालू आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलिस हवलदार सुरज गायकवाड, राहुल यादव,प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख, सचिन ताजने , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर मोबाईल सेल पोलीस हवलदार सचिन धनाड, संतोष दरेकर, रामेश्वर वेताळ यांनी केलेली आहे.




Post a Comment
0 Comments