Type Here to Get Search Results !

मुळा धरणातून नदीपात्रात जायकवाडीकडे पुन्हा पाणी झेपावले

मुळा धरणातून नदीपात्रात जायकवाडीकडे पुन्हा पाणी झेपावले 

राहुरी ( प्रतिनिधी )

नगर जिल्ह्याला संजीवनी ठरलेल्या मुळा धरणातून पुन्हा एकदा नदीपात्रात आज सोडण्यात आले . जुलै आणि ऑगस्टमध्ये सलग दोन वेळा पाणी सोडण्याची ही बहुदा क्वचितच वेळ असावी .



            आज सकाळी धरणसाठा पंचवीस टीएमसी वर पोहोचला . धरण परिचारण सूचीनुसार 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी अतिरिक्त पाणी मुळा नदी पात्रात सोडण्याचे निर्देश आहेत . 



        गेल्या दोन दिवसात मुळा धरणात दोन टीएमसी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली . परिणामी धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरत आलेले आहे .

आज सकाळी मुळा धरणाकडे पाच हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती , दुपारी ती 4 हजार 421 क्युसेक इतकी होती .

यंदाच्या हंगामात 15 ऑगस्ट पर्यंत धरणात 16 टीएमसी हून अधिक पाणी जमा झालेले आहे . मुळा धरणातून मुळा नदी पात्रात  जायकवाडी कडे पुन्हा पाणी झेपावले आहे.  जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments