सव्वाशे कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या या लोकप्रिय संस्थेची शाखा आता वांबोरीत : उत्साहात होतेय उद्घाटन
राहुरी ( प्रतिनिधी )
प्रेरणा पतसंस्थेच्या सातवी शाखा वांबोरीत सुरू होत आहे . शाखेचा उद्घाटन सोहळा उद्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मार्केट कमिटी गेट
शेजारी वांबोरी येथे होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे यांनी दिली .
प्रेरणा पतसंस्थेच्या या शाखेचा शुभारंभ डाँ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे.
प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी सव्वाशे कोटी रुपये असून कर्ज वितरण 77 कोटी रुपये झाले आहे .
32 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या पतसंस्थेचे वीस वर्षांपूर्वी संगणकीकरण झालेले आहे .
कोअर बँकिंग ते सर्व बँकिंग सुविधा वांबोरीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत . संस्थेचे मोबाईल ॲप देखील आहे. या सर्व बँकींग सुविधा वांबोरी सारख्या बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध होत आहेत
ग्राहकांची अनेक वर्षांची अडचण आता दूर होणार असल्याचे सुरेश वाबळे यांनी सांगितले. संस्थेच्या या आधी गुहा ,म्हैसगांव, तांभेरे ,राहुरी ,आंबी व श्रीरामपूर येथे शाखा आहेत.पुढील महिन्यात ब्राह्मणी व देवळालीप्रवरा येथे कार्यान्वित होणार आहेत असे व्हा . चेअरमन मच्छिंद्र हुरुळे यांनी सांगितले.





Post a Comment
0 Comments