Type Here to Get Search Results !

राहुरी शहर जनरल व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्वप्निल कासार यांची बिनविरोध निवड

राहुरी शहर जनरल व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्वप्निल कासार यांची बिनविरोध निवड



राहुरी ( प्रतिनिधी )

 राहुरी शहर स्टेशनरी ,जनरल, कॉस्टेमिक व झेरॉक्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. नुकतेच नेवासा येथे एका दुकानाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रासने कुटुंबातील ५ व्यापारी बांधवांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

 संस्थेचे मावळते अध्यक्ष श्री अनिल भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये सचिव  अप्पासाहेब सरोदे यांनी गेल्या ५ वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली व कोषाध्यक्ष  युवराज चव्हाण यांनी आर्थिक ताळेबंदाचा हिशोब मांडला.


           यावेळी जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. स्वप्निल कासार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रासने,सचिवपदी श्री.अप्पासाहेब सरोदे, खजिनदारपदी श्री.युवराज चव्हाण , संपर्कप्रमुख श्री.मधुकर घाडगे यांची निवड करण्यात आली.  


          यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.स्वप्निल कासार म्हणाले की , सर्वांनी एकमताने माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यापुढील काळात असोसिएशनच्या सर्व सभासदांचे हित लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेऊन अनेक विधेयक कामे आपण करणार आहोत.


 


           असोसिएशनच्या माध्यमातून व्यापारी बांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा संकल्प आम्ही केला आहे.


           या बैठकीसाठी श्री.अनिल भट्टड , श्री.सिद्धार्थ रासने , श्री.मधुकर धाडगे, श्री.युवराज चव्हाण, श्री.आप्पासाहेब सरोदे, श्री. किरण पवार, श्री.जैन सर, श्री.राजेश उपाध्ये , श्री .रविभाऊ जाधव, श्री.अमर कुंभकर्ण, श्री.मुकुंद कोळपकर, श्री.प्रकाश इंगळे, श्री.नवनाथ पवार, श्री.महेश राका, श्री.किशोर निंगुणकर सर, रेहान शेख यांच्या सह व्यापारी बांधव उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments