पावसाचं धुमशान सुरूच : राहुरीत 110 मिली पाऊस ; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
राहुरी ( प्रतिनिधी )
नगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाचं धूमशाण सुरूच असल्याने अहिल्यानगर चे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोमवार दिनांक 15 व 16 सोमवारी मंगळवारी शाळांना अतिवृष्टीच्य शक्यतेने सुट्टी जाहीर केली आहे .
राहुरीत आज सकाळपर्यंत ११० मिलिमीटर पाऊस सतर्क च्या पर्जन्यमापकावर नोंद झाला आहे .
परवा राहुरीत 60 मिलिमीटर , काल 12 मिलिमीटर तर आज तब्बल 110 मिलिमीटर म्हणजेच राहुरीत अतिवृष्टी झाली आहे .
दरम्यान मुळा धरण क्षेत्रात जोरदार पावसाने धरणातून सोमवारी दुपारी ५००० क्युसेकने सोडण्यात येणाऱ्या विसर्गत वाढ करून 7000 क्युसेक करण्यात आला.
मध्यरात्री मुळा धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून पाण्याची आवक लक्षात घेता मुळा नदी पात्रात विसर्ग वाढवत दहा हजार क्युसेकने करण्यात आला . जलसंपदा विभागाच्या कडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
दरम्यान गेल्या तीन दिवसांत राहुरीत 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असून सध्या देखील मोठ्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे . अतिवृष्टी सारख्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे .




Post a Comment
0 Comments