पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप
राहुरी / लोणी ( प्रतिनिधी )
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आदिवासी सेवाभावी संस्थेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम लहुजी शक्ती सेना , सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि सप्तशृंगी महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, दप्तरे, कंपास पेटी, शालेय गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना आवश्यक मदत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी लहुजी शक्ती सेनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष किशोर रामचंद्र सकट,सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.सारिका नागरे मॅडम आणि सप्तशृंगी महिला विकास मंडळ संचलित चॅलेंज क्लासेसचे संचालक राजेंद्र श्रीवंत सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सुवर्ण भरारी ग्रामीणचे राहुलजी उनवणे,श्रीमती कुसुमताई,मनीष ससाणे,राहुल सकट,सोनू शिंदे,आणि रोहित हाटांगळे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सामूहिक प्रयत्नांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी एक नवी उमेद मिळाली. हे सर्व मान्यवर समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल कौतुकास पात्र आहेत.


Post a Comment
0 Comments