शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे शिल्पकार - सुजित वाबळे
राहुरी ( प्रतिनिधी )
शिक्षक हे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणारे शिल्पकार असते. त्यांच्या मेहनतीमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने आयुष्यात वाटचाल सुरू करत असतात असे प्रतिपादन प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील वाबळे वस्तीवर जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम शिक्षिका मिनाक्षी भीमा चौधरी यांची बदली झाल्यामुळे शाळेच्या आवारात निरोप समारंभ पार पडला. प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश ओहोळ होते. यावेळी तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक उरहे, बाळासाहेब वाबळे, महेंद्र कोळसे, गीताराम कोळसे, रावसाहेब कोळसे,विकास महाराज हापसे,श्री.मांजरे,चंद्रकांत थोरात,अर्जुन कोळसे,श्री.वदक, चंद्रभान वाबळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना वाबळे म्हणाले की, "बदली हा शासकीय सेवेतला एक नैसर्गिक टप्पा आहे. मात्र जिथे जिथे मिनाक्षी चौधरी त जातील, तिथेही विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करतील, याची खात्री आहे. वाबळेवस्ती शाळेतून जाणाऱ्या या शिक्षिकेचा ठसा मात्र कायम स्मरणात राहील.
शिक्षिका चौधरी यांना निरोप देताना. चिमुरड्यासह पालकांचे व ज्येष्ठ नागरिकांचे डोळे पानावले.उपस्थितांना स्नेहभोजनही देण्यात आले.
यावेळी शरद वाबळे,सरस्वती कोळसे,प्रभाकर कोळसे, माया कोळसे ,रुपाली कोळसे, अर्चना वाबळे, रेश्मा वाबळे,पांडुरंग कोळसे,देवयानी वाबळे, स्वरा कोळसे, अहदा कोळसे, मनोज ओहोळ ,श्रीमती पाचपिंड, श्रीमती राऊत, श्रीमती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पोपट कोळसे,लक्ष्मण कोळसे, इंद्रभान कोळसे,रंभाजी कोळसे,रविंद्र कोळसे,गंगाधर कोळसे, आकाश पानसरे,बाळासाहेब कोळसे, गणेश कोळसे,भाऊसाहेब कोळसे,योगेश वाबळे,विजय वाबळे,आवजीनाथ वाबळे,चांगदेव कोळसे, दत्तात्तय वाबळे, चैतन्य कोळसे, बाबासाहेब कोळसे,हरी कोळसे, सिताराम वाबळे,अनिल कोळसे,मिनीनाथ कोबरणे,सुनिल कोबरणे, राहुल भगत,गोकुळ काळे,शशिकांत कोबरणे, अंकुश वने,अण्णासाहेब वाबळे, अनिल अशोक कोळसे,आप्पासाहेब वाबळे,प्रशांत आहेर, राजेंद्र कोळसे, रामचंद आहेर, बबन कोळसे, योगेश कोबरणे, सोमनाथ कोळसे,संजय कोळसे, पांडुरंग कोळसे,बापुसाहेब कोळसे आदिंसह ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सोमवते यांनी केले तर आभार श्रीमती राजगुरू यांनी मानले.


Post a Comment
0 Comments