एक रुपयात पिक विमा शासनाने बंद केल्यामुळे...... पहा बातमीत
राहुरी ( प्रतिनिधी )
गेल्या आठवडाभरापासून सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्या पावसाने शेतीमालाचा अक्षरशः चिखल झाला असून माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी थेट
शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शेत गाठले .
प्राजक्त तनपुरे यांनी शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भरपाई देण्याची मागणी केली आहे .
गेल्या आठवडाभरापासून राहुरीसह सर्वत्र दररोज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे , परिणामी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अक्षरशः शेतीपिकांचा चिखल झाल्याचे दृश्य आहे .
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राहुरी 102 मिलिमीटर (68% ) पाऊस झाला आहे . परंतु हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार हाच सप्टेंबर मधील काल अखेर 236 मिलिमीटर (१५८ %) इतका दिसून येत आहे तर राहुरी येथील स्थानिक सतर्क या अभ्यास गटाकडील नोंदीनुसार 250 मिलिमीटर (166 %) पाऊस नोंद झाला आहे. शासकीय निकषामुळे व आकडेवारीतील तफावतीमुळे आणि प्रत्यक्ष झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येते .
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ राहुरी शहर परिसर जोगेश्वरी आखाडा तसेच पाथर्डी व नगर तालुक्यातील करंजी व अन्य ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली . यावेळी तनपुरे यांनी म्हटले की , दररोज 40 मिलिमीटर होऊन अधिक पाऊस पडत आहे , काही ठिकाणी तर तो 100 मिलिमीटर पेक्षाही अधिक पडलेला दिसत असून शेतीमालाचा अक्षरशः चिखल झाला आहे . मागील वर्षी एक रुपया प्रमाणे पीक विमा शासनाने बंद केल्याने यंदा पीक विम्याकडे बहुतांश शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे . त्यातच असा अतिवृष्टी सदृश्य व काही ठिकाणी तर ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे , अक्षरशः खर्च निघेल की नाही याची चिंता वाढली आहे . शासनाने सर्व निकष बाजूला ठेवत तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी . कृषी विभागाला व महसूल विभागाला तात्काळ आदेश देऊन पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई तात्काळ द्यावी , अशी मागणी केली आहे .


Post a Comment
0 Comments