Type Here to Get Search Results !

राहुरीतील पावसाची आकडेवारी : गोलमाल है भाई सब गोलमाल है

राहुरीतील पावसाची आकडेवारी : गोलमाल है भाई सब गोलमाल है 



राहुरी ( प्रतिनिधी )

सप्टेंबर मधील होणाऱ्या अतिवृष्टीच्या आकडेवारीचा झोल होत असून राहुरीत पावसाचे आकडेवारीमध्ये गोलमाल दिसून येत आहे . त्यामुळे ओला दुष्काळ व अतिवृष्टीच्या मदतीत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे .



 गेल्या आठवडाभरापासून राहुरीसह नगर जिल्ह्याच्या विविध भागात विस्तृत स्वरूपात व ढगफुटी सदृश्य पाऊस सातत्याने पडत आहे , त्याचा परिणाम सर्वत्र पिकपाण्यावर दिसून येत आहे .



                  [  हे घ्या आकडेवारी ]

अतिवृष्टीचे शासकीय निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अट आहे . पूर्वी प्रत्येक शासकीय कचेरीमध्ये पावसाचे आकडे गोळा होत असल्याने लगेच परिस्थिती लक्षात यायची .



मात्र स्कायमेट व अन्य खाजगी संस्थांना याचे कंत्राट देण्यात आले होते . सध्या शासनाच्या कृषी विभागाकडे मंडलस्तरावरील पावसाची आकडेवारी शासकीय गृहीत धरली जाते .

राहुरी तालुक्यात गमतीदार परिस्थिती आहे . शासकीय पर्जन्यमापक केंद्र राहुरी गावठाण ( रेल्वे स्टेशन जवळ ) आहे तर हवामान शास्त्र विभागाची हेच पर्जन्यमापक केंद्र धर्माडी गेस्ट हाऊस समोरील भागात आहे . आणि अन्य एका शासकीय विभागाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठात पर्जन्यमापन आहे .

प्राप्त माहितीनुसार , सप्टेंबर मध्ये शासकीय माहितीत राहुरीत पाऊस 102 मिलिमीटर 68% इतका नोंद झाला आहे तर हवामान विभागाचा 206 मिलिमीटर 138% पाऊस नोंद झाला आहे . ( याची आकडेवारी उपलब्ध आहे ) तर स्थानिक सतर्क अभ्यास गटाकडे 190 mm 128% पाऊस नोंद झाला आहे . 

त्यामुळे या सर्व आकडेवारी मध्ये शेती शेतकरी व शेतीमालाचे नुकसानासह अतिवृष्टी व बाधित भागामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठीचे आकडे हे तोकडे दिसत आहेत.  

एवढेच नव्हे तर शासकीय आकड्यांमध्ये दोन दिवसांच्या पावसाची अक्षरशः नोंद झाली नसल्याचे समजते . त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून "गोलमाल है भाई सब गोलमाल है " असे चित्र तर नव्हे ! असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे .





Post a Comment

0 Comments