निकषांमुळे पंचनामांचाही होत आहे पंचनामा ; बळीराजाचा बळी गेल्यावर भरपाई मिळणार काय ? बळीराजाचा आक्रोश
राहुरी ( प्रसाद मैड व टीम सतर्क )
सततच्या पावसानं चिखल झालेल्या शेती पिक कालच्या पावसाने अक्षरशः वाहून गेल्याचे चित्र असून शासनाच्या पंचनाम्याचा अक्षरशः पंचनामा झाल्याचे चित्र आहे .
गेल्या काही दिवसांपासून शासकीय सरासरीच्या दुपटीपेक्षाही अधिक पाऊस झाल्याने कांदा , सोयाबीन , कपाशी व चारा पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे . शनिवारच्या पावसाने तर सर्वत्र अस्मानी , सुलतानी अशी संकटे पार केल्याचे दिसत आहे .
उभ्या शेतात पावसाने पिकांचा चिखल झालेला असताना अक्षरशः घर , गोठा , शेड व घराच्या ओसरीतील साठवलेली पीक , अन्नधान्य ही पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे दिसते दिसत आहे . राहुरी तालुक्यातील दिग्रस , देेसवंडी , केंदळ, मानोरी , टाकळीमिया , सोनगाव , कोंडवड , सात्रळ, आदी भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने दुसऱ्या गावांशी संपर्क तुटलेला आहे .
दुपारपर्यंत राहुरी तालुका महसूल प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती . उंबरे येथील डाग वस्ती जवळील अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली .
शासन स्तरावर नुरा कुस्तीचे खेळ सुरू असताना शेतकऱ्यांसाठी शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी . परंतु पंचनाम्यामध्ये अटी , शर्ती , नियम ,
निकष याबाबत बुद्धिबळातील डाव सध्याचे शासन व सरकार करत आहे काय ? असा सवाल भाबड्या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे .
दोन ते तीन पट झालेल्या पावसाने अन्नधान्य अक्षरशः वाहून जात असताना सरकारच्या पंचनाम्याचा मात्र पंचनामा नक्कीच उघड झाला असून बळीराजाचा बळी गेल्यावर सरकार मदत करणार काय ? असा प्रश्न विचारला जात आहे .





Post a Comment
0 Comments