Type Here to Get Search Results !

मुळाधरणातून विसर्ग वाढवत 15 हजार क्युसेकने : राहुरीत रात्रीपर्यंत 65 मिलिमीटर पाऊस

 मुळाधरणातून विसर्ग वाढवत 15 हजार क्युसेकने : राहुरीत रात्रीपर्यंत 65 मिलिमीटर पाऊस 



राहुरी ( विशेष प्रतिनिधी )

नगर जिल्ह्यातील धरणाच्या धरण क्षेत्रात सातत्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस होत असल्याने मुळा धरणाचा पूर नियंत्रण कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसत आहे .



 आज सकाळी 2 हजार क्युसेकने सोडण्यात येणारा विसर्ग रात्री नऊ वाजता वाढवत वाढवत जात तब्बल 15000 क्युसेक वेगाने करण्यात आला आहे . नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

  मुळा धरणसाठा ऑगस्ट अखेर 99 टक्के पर्यंत पोहोचला असून धरणाच्या परिचलन सूची निर्देशाप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात धरण भरल्याचे जाहीर केले जाते . गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्र व लाभक्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे . मुळाधरणाच्या नजीकच्या भागात राहुरी , पारनेर कडील भागात जोरदार पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे . त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षा कडून तासा तासाला घेतली जात आहे .

जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी पी व्ही पाटील शाखा अभियंता राजेंद्र पारखे व पूर नियंत्रण कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. सकाळी धरणातून मुळा नदीपात्रात जायकवाडीकडे 2 हजार क्युसेकने सोडलेल्या विसर्ग सायंकाळपर्यंत वाढवत वाढवत रात्री नऊ वाजता पंधरा हजार क्युसेकने सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

दरम्यान , राहुरीत सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत 65 मिलिमीटर होऊन अधिक पाऊस झाल्याचे सतर्क राहुरी या अभ्यास गटाने सांगितले . पुढील दोन दिवस पावसाची शक्यता पाहता नागरिकांनी ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर सायंकाळी उशिरा केले आहे . हवामान विभाग , जिल्हा आपत्कालीन विभाग यांनीही सतर्कता बाळगावी असे आवाहन सोशल मीडियावर केले आहे .

Post a Comment

0 Comments