Type Here to Get Search Results !

प्रेरणा पतसंस्थेने केवळ नफा कमावला नाही तर सामाजिक बांधिलकी जपत सामान्यांचे जीवनमान उंचवण्याचा केला प्रयत्न ज्येष्ठ नेते मा.खा प्रसाद तनपुरे

प्रेरणा पतसंस्थेने केवळ नफा कमावला नाही तर सामाजिक बांधिलकी जपत सामान्यांचे जीवनमान उंचवण्याचा केला प्रयत्न ज्येष्ठ नेते मा.खा प्रसाद तनपुरे



 राहुरी  ( प्रतिनिधी )

पतसंस्था , सहकारी बँका चालवणे म्हणजे नुसते पैसे देणे घेणे व नफा कमवणे नव्हे तर आपल्या भागातील सामाजिक बांधिलकी जपण्याचा समाजाची उन्नती होऊन आपल्या भागातील लोकांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते याच तत्वाला अनुसरून राहुरीच्या प्रेरणा पतसंस्थेचे काम उत्तम प्रकारे सुरू असल्याने संस्थेचे संचालक मंडळ व संस्थापक सुरेश वाबळे अभिनंदनस पात्र आहेत , असे प्रतिपादन माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी केले .



राहुरीच्या प्रेरणा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या 33व्या वार्षिक सर्व साधारण सभेत प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते पतसंस्थेच्या कारभार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते लोकांच्या ठेवी विश्वासातून घेतल्या जातात ठेवीदार व कर्जदार यातील दुवा म्हणून पतसंस्थेचे कार्य चालते प्रेरणा पतसंस्थेच्या संचालकांनी मिळणाऱ्या नफ्यातून लाभांश वाटतानाच वेळेवर कर्जफेड करणाऱ्या सभासदांना काही सूट देता येत असल्यास देण्याचा प्रयत्न करावा याचबरोबर परिसरातील नवीन शिकणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शिका यासारखे उपक्रम राबविले जावेत अशी आशा यांनी व्यक्त केली या पुढील काळात शासनाकडून पतसंस्थेच्या नफ्यावर आयकर परतावा लागू शकतो यासाठी संस्थेने मिळालेल्या नफ्यातून समाजात प्रॉडक्टिव्ह काम उभे करावे यातून समाजाची मोठी उन्नती होईल ग्रामीण भागातून अधिकारी खेळाडू समाजसेवक यासारखे नामवंत तयार झाल्यास पतसंस्थेचा खरा हेतू सफल होईल प्रेरणाच्या संचालकांनी गुहा सारख्या ग्रामीण भागात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक मोठ्या प्रमाणावर आहे त्यांच्यासाठी स्वातंत्र्यसैनिक भवन व तेथे सुविधा निर्माण करण्याच सामूहिक प्रयत्न ग्रामस्थांच्या सहकार्यातून करावा अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली व्यासपीठावर यावेळी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अण्णासाहेब चोथे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज. साई आदर्श परिवाराचे संस्थापक शिवाजी आप्पा कपाळे कारखान्याचे संचालक बाळकृष्ण कोळसे गुहाच्या प्रथम नागरिक अरुणाताई ओहो ळ आदी मान्यवर उपस्थित होते

 प्रेरणाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश राव वाबळे यांनी संस्थेची ते अहमदनगर जिल्हा असून वसूल भाग भांडवल दोन कोटी 29 लाख तर निधी 9 कोटी 35 लाख रुपये याप्रमाणे आहे संस्थेने एकुण ठेवी 125 कोटी एकूण कर्जवाटप 75 कोटी 29 लाख रुपयांपर्यंत केलेले असून गुंतवणूक जवळपास 45 कोटींची आहे संस्थेमध्ये 134 कोटी रुपयांचे खेळते भांडवल असून.80 लाखाच्या आसपास संस्थेची मालमत्ता आहे अहवाल सालात संस्थेची 893 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असून यावर्षी सर्व खर्च वजा जाता संस्थेला 62 लाख रुपयाचा नफा झालेला असल्याची माहिती देतानाच अध्यक्ष वाबळे यांनी सभासदांना यावर्षी 12 टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला व प्रेरणा विधिकारी सेवा सोसायटीचा सात टक्के लाभांश निर्णय झाला त्यास सर्व उपस्थित सभासदांनी टाळ्याच्या गजरात दाद दिली 

 तालुक्यातील सभासदांच्या पाल्यांनी विविध विभागात मिळवलेल्या विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला सभेसाठी कारखान्याचे मा .संचालक बाळकृष्ण कोळसे नारायण जाधव द्वारकानाथ बडदे शिवाजी कोळसे, भाऊसाहेब गाडे .

 सतीश जाधव भागवतराव कोळसे रमेश पवार, प्रेरणाचे मल्टीस्टेट चेअरमन सुजित वाबळे व्हा . चेअरमन प्रा लांबें सर विष्णूपंत वरपे. आदींसह मान्यवर सभासद नागरिक उपस्थित होते . प्राध्यापक लांबे सर यांनी आभार मानले . राज्य सहकारी संघातर्फे साखरे सरांचे प्रशिक्षण आयोजित केली होते .

Post a Comment

0 Comments