Type Here to Get Search Results !

पालिका कारभाराच्या अनागोंदीवर या माजीमंत्र्यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

पालिका कारभाराच्या अनागोंदीवर या माजीमंत्र्यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल


 राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारावर वरून माजीमंत्री प्राजक्त तनपुरेसह


 

समर्थक व नागरिकांनी पालिका कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला . राज्यातील भाजप सरकारवर यावेळी तनपुरे यांनी हल्लाबोल चढविला .



 गेल्या चार वर्षांपासून राहुरी नगरपालिकेवर पालिका निवडणुका न झाल्याने प्रशासकीय राज आहे . अनेक वेळा पालिकेचे मुख्याधिकारी बदलले , परिणामी राहुरी शहरात वेगवेगळे प्रश्न सध्या शहर व परिसरातील नागरिकांना भेडसावत आहेत .



त्यातच पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली झाली .

 या पार्श्वभूमीवर आज माजीमंत्री प्राजक्त तनपूरेंचा व युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा काढण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने



          युवा नेता हर्ष तनपुरे यांनी केली पोलखोल

तनपुरे समर्थकांसह नागरिक उपस्थित होते . लोकांची कामे होईना, प्रशासकावर वरदहस्त सत्ताधाऱ्यांचा, कचऱ्याला गाडी येईना लोकांचा संताप आहे . 

यावेळी माजी मंत्री तनपुरे म्हणाले की , गेल्या चार वर्षांपासून प्रसाकी प्रशासकीय राज आहे . महाविकास आघाडीच्या काळात राहुरी शहरात विविध विकास कामे करण्यात आली . शहरातील प्रवेश तीन प्रवेशद्वारांवर कमानी , जॉगिंग ट्रॅक , विविध सुशोभीकरण तसेच अन्य कामे करण्यात आली . मात्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात शासन असताना सध्याच्या विरोधकांनी कोणती कामे शहराच्या विकासासाठी केली ते सांगावे , असा आरोप केला . राहुरी पालिकेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी आणला नाही , असा टोलाही तनपुरे यांनी लगावला .

 युवा नेते हर्ष तनपुरे म्हणाले की , राहुरी पालिकेमध्ये अनेक रिक्त पद आहेत . मुख्याधिकारी , प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत . विरोधकांची सत्ता राज्यात व केंद्रात असूनही त्यांना काहीही करता आल्या नसल्याचा आरोप हर्ष तनपुरे यांनी केला .

 यावेळी पालिकेतील कोणताही जबाबदार अधिकारी नसल्याने प्राजक्त तनपुरे , हर्ष तनपुरे व संतप्त समर्थक आणि नागरिकांनी राहुरी नगरपालिकेतील मुख्याधिकारी कार्यालयातील खुर्चीला हार घातला . यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments