Type Here to Get Search Results !

चंद्रग्रहणाला लागणार ढगाळ वातावरणाचे ग्रहण ; खगोल प्रेमींना चिंता चंद्र दर्शनाची

चंद्रग्रहणाला लागणार ढगाळ वातावरणाचे ग्रहण ; खगोल प्रेमींना चिंता चंद्र दर्शनाची


सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त



       रविवार दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रग्रहणाचा तमाम खगोल प्रेमींना योग आला आहे . मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधून मधून पावसाच्या सरीमुळे रविवारी रात्री हे विलोभनीय चंद्रग्रहण दिसणार का ! असा प्रश्न खगोल प्रेमींना पडला आहे .

        122 वर्षांनी हे खगोलीय घटना दिसणार आहे . शिवाय एक  खग्रास चंद्रग्रहण असल्याने पूर्ण चंद्र झाकला जाणार असून ,  चंद्राचे दृश्य लालसर दिसणार आहे , हे खगोलीय वैशिष्ट्य असणार आहे. ढगाळ वातावरणाच्या ग्रहणामुळे खगोलप्रेमींना चंद्रग्रहण आपल्या उघड्या डोळ्यांनी पहावयास मिळेल की नाही याबाबत चर्चा सुरू झाली आहे .

         रविवार ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.५७ ते १.२७ मिनिटांपर्यंत पूर्ण चंद्रग्रहण पाहता येईल . भारतात ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.५७ वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि रात्री ११.४१ वाजता ग्रहणाच्या मध्यभागी असलेली संपूर्ण प्रतिमा पृथ्वीच्या सावलीने झाकली जाईल ( पूर्ण ग्रहण ) . हे ग्रहण पहाटे १:२७ वाजता संपेल. ग्रहण ९.५७ ते १.२७ पर्यंत साडेतीन तास चालेल.

Post a Comment

0 Comments