Type Here to Get Search Results !

मुळा धरण भरले तुडुंब : धरणातून पाच हजार क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

 मुळा धरण भरले तुडुंब : धरणातून पाच हजार क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग


राहुरी ( प्रतिनिधी )

मुळा धरण क्षेत्रात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच कामगिरी केली . जुलै महिन्यातच धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली , एवढेच नव्हे तर



ऑगस्टमध्ये ही धरणसाठा 90 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर धरणातून मुळा नदी पात्रात पूरनियंत्रण पातळीसाठी जायकवाडी कडे पाणी सोडले गेले .


            आता सप्टेंबर मध्येही पावसाच्या कामगिरीमुळे धरणातून पाण्याचा नदीपात्रातील विसर्ग सुरूच आहे .




शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी मुळा धरणाचा पाणीसाठा पंचवीस हजार 857 दशलक्ष घनफुटावर पोहोचला तर पाण्याची पातळी 1811.75 फुटांवर पोहोचली .

दरम्यान पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाकडे 5 हजार 921 क्युसेकने पाण्याची आवक झाल्याने आज दुपार नंतर धरणातून 2 हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवत तो पाच हजार क्युसेकने करण्यात आला आहे .

मुळा धरणात यंदाच्या वर्षी 5 सप्टेंबर पर्यंत तब्बल 18 टीएमसी नव्याने पाणी दाखल झालेले आहे . 

दरम्यान , मुळा नदीतून पाच हजार क्युसेकने पाणी दुथडी भरून वाहत असल्याने उद्या विसर्जन मिरवणूक असल्याने मुळा नदी पात्रात प्रवेश न करता गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी गणपतीचे विसर्जन शासनाने निर्देशित केलेल्या ठिकाणी करण्यात आली आहे . 

Post a Comment

0 Comments