गणपती विसर्जन सोहळा पारंपरिक भक्तिरंगात रंगला
"बाप्पा तुझी कृपा" या नव्या गीताने भक्तांची मने जिंकली
अहिल्यानगर ( प्रतिनिधी )
यंदाच्या गणपती विसर्जनाला एक आगळावेगळा भक्तिरंग लाभला. नेहमीच्या DJ च्या गोंगाटाऐवजी पारंपरिक भजनाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात
आला. टाळ-मृदंग आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. विसर्जनाचा हा सोहळा भक्ती,
शांती आणि संस्कृतीच्या वारशाची जपणूक करणारा ठरला.
याच पार्श्वभूमीवर सादर झालेले नवे गीत "बाप्पा तुझी कृपा" विशेष आकर्षण ठरले. हे गाणे NP VISION FILMS या चॅनेलखाली प्रकाशित झाले असून, दिग्दर्शन प्रमोद पंडित यांनी केले आहे. गाण्याचे निर्माता आबा निर्मळ असून, त्यांनी या गाण्याद्वारे परंपरा आणि भक्तीचा संगम साकारण्याचा प्रयत्न यशस्वीरीत्या केला आहे.
या गाण्यात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने भक्तिरस अधिक खुलवला.
सहकलाकार पुढीलप्रमाणे होते –
राजाराम आहेर महाराज, नीलम शिंदे,वनिता निर्मळ, सुहास निर्मळ, राणी निर्मळ, सविता निर्मळ, भाऊसाहेब मोगल, ज्ञानदेव शिंदे,डॉ. अण्णासाहेब म्हाळसकर, देविका निर्मळ, तनश्री निर्मळ तसेच बालकलाकार धनश्री निर्मळ, स्वरा निर्मळ, वेदिका निर्मळ आणि चि. आदेश निर्मळ.
गाण्याच्या शूटिंगदरम्यान प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेतून भक्तीभाव जिवंत केला. परिणामी "बाप्पा तुझी कृपा" हे गीत विसर्जन सोहळ्याचे आध्यात्मिक वैशिष्ट्य ठरले.
या उपक्रमामुळे विसर्जन सोहळा केवळ उत्सव न राहता भक्ती, शिस्त आणि परंपरेची जपणूक करणारा प्रेरणादायी सोहळा ठरल्याची भावना पत्रकार ,प्रसाद मैड,शंकर सोनवणे ,ज्ञानेश्वर साबळे ,तसेच सर्वत्र व्यक्त होत आहे.



Post a Comment
0 Comments