या जेष्ठ नेत्याच्या वाढदिवसाला सत्कारखर्चाला फाटा देत समर्थकांकडून गोशाळेला देणगी भेट
राहुरी ( प्रतिनिधी )
ज्येष्ठ नेते एड. सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वांबोरीत त्यांच्या निवासस्थानी आज शेकडो समर्थकांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी वाढदिवसाच्या सत्कार खर्चाला फाटा देत उपस्थित समर्थकांनी गोशाळेला रोख व ऑनलाईन स्वरूपात देणगी देणग्या दिल्या .
या उपक्रमाची सर्वत्र स्तुती व चर्चा होत आहे . वांबोरी येथील ज्येष्ठ नेते एड. सुभाष पाटील यांचं नगर जिल्ह्यात एक वेगळे राजकीय , सामाजिक वलय गेल्या अनेक वर्षांपासून आहे .
त्यांचे व्यक्तिमत्व , स्वभाव , वक्तशीरपणा , व्यापक राजकीय व सामाजिक जनसंपर्क यामुळे काही मोजक्या लोकप्रिय व अभ्यासू राजकीय नेत्यांपैकी एक एड. सुभाष पाटील समजले जातात . जिल्ह्यातही त्यांचा दांडगा संपर्क आहे .
काय आहे राधाकृष्ण शाळा सेवा संस्था -
वांबोरी - नगर रस्त्यावरील वांबोरी घाटालगत एड. सुभाष पाटील यांच्या अधिपत्याखाली राधाकृष्ण गोशाळा सेवा संस्थेची दोन वर्षांपूर्वी स्थापना केलेली आहे .
सध्या या गोशाळेत शंभरहून अधिक गोधन असून नियमित चारापाणी व देखभालीसाठी लक्ष दिले जाते. ज्येष्ठ नेते एड. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी खर्चाला फाटा देत आज ऑनलाईन पद्धतीने व रोख स्वरूपात या गोशाळेला देणग्या दिल्या. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे .




Post a Comment
0 Comments