....या ज्येष्ठ नेत्याने केली एसटी अधिकाऱ्याची कान उघडणी
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी येथील ५ कोटी रुपये खर्चाच्या बस स्थानकाचे बांधकामाची मुदत संपत आलेली असतानाही स्थानकाचे काम अतिशय धिमे गतीने सुरु असून स्थानकाचे काम ४०/४५ टक्केच झाल्याने माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी खंत व्यक्त केली .
यावेळी त्यांनी बस स्थानकाचे कामाची पाहणी केली असता त्यांनी ठेकेदार,एस टी च्या अधिकारी यांना फोनवरून कान उघडणी केली.
अश्या संथ गतीने काम चालल्यास बस स्थानकाचे काम पूर्ण होण्यास २०२७ उजाडेल तेव्हा सदर कामास गती देण्याची मागणी अधिकारी ठेकेदार यांना केली.
माजी खासदार प्रसाद तनपुरे राहुरी बस स्थानकाच्या प्रश्नावर सुरवाती पासून लक्ष ठेऊन असून अगदी जुन्या बस स्थानकाच्या जीर्ण झालेल्या इमारती पासून ते नवीन बांधकामास मंजूर आणे पर्यत सतत ते विचारपूस करून बांधकाम करताना कोणतीही अडचण येई नये काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी त्यांची अपेक्षा असताना ही अपेक्षा फोल ठरत गेल्याने त्यांनी राहुरी बस स्थानकाचा प्लॅन ज्यांनी तयार केला ते वास्तुविशारद (आर्किटेक्चर ) देवगावकर यांचेशी चर्चा केली असता त्यांनीही सदर काम अतिशय संथ गतीने चालल्याचे सांगितले.एस टी चे वरिष्ठ अधिकारी या कामाबाबत कुठलेही सहकार्य करीत नसल्याची खंत प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केली. एस टी च्या बांधकाम विभागाच्या अभियंता वाघ यांचेशी तनपुरे यांनी संपर्क केला असता त्यांनी सदर कामाची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे सदर स्थानकाच्या कामाचे ठेकेदार,अभियंता कधीही भेटत नसल्याची तक्रार एस टी च्या बांधकाम अभियंता वाघ यांनीही केली काम अतिशय धिमे गतीने सुरु असल्याच्या गोष्टीसाठी दुजोरा दिला. अद्याप या स्थानकाचे काम फक्त ४०/४५ टक्केच झाले असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून उर्वरित काम जर याच पद्धतीने झाले तर राहुरी बस स्थानकाचे काम पूर्ण होण्यास २०२७ च उजाडेल असे त्यांनी म्हंटले. वास्तविक सदर बस स्थानकाचे कामासाठी जो निधी मंजूर झाला त्याची सर्व रक्कम मिळालेली असताना कामास उशीर होण्याचे कारण काय असा प्रश्न ठेकेदाराचा बांधकाम अभियंता यास विचारला असता त्यास फॅब्रिकेशन चे डिसाईन अद्याप उपलब्ध नाही आर्किटेक्चर याचेकडून पुढचे डिसाईन मिळाले नसल्याची तक्रार तनपुरे यांचेकडे केली असता त्याबाबत तनपुरे यांनी आर्किटेक्चर यांचेशी संपर्क केला असता माझेकडून सर्व डिसाइन दिलेले असल्याचे सांगितले.यावेळी तनपुरे यांनी श्रीरामपूर आगराचे मॅनेजर बहेर, बांधकाम इंजिनिअर,तसेच राहुरी येथील स्थानक प्रमुख गोविंद गुलदगड यांचेशी चर्चा केली व कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
फोटो



Post a Comment
0 Comments