Type Here to Get Search Results !

रस्ताअपघात बळी प्रकरणी या माजीमंत्र्यांनी चांगलेच खडसावले... पहा बातमीत व्हिडिओसह

रस्ताअपघात बळी प्रकरणी या माजीमंत्र्यांनी चांगलेच खडसावले... पहा बातमीत व्हिडिओसह 



राहुरी  ( प्रतिनिधी )

नगर मनमाड रस्त्यावर झालेल्या अपघात ग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्यात यावी व या रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदारावर व राष्ट्रीय प्राधिकरण




अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा , या मागणीसाठी आज राहुरीकरांनी तहसील कचेरीवर मोर्चा काढला .




नगर मनमाड महामार्गावर गेल्या आठवड्याभरात तीन ते चार जणांचा बळी गेला . या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत , दररोज हजारो मोटार सायकल , कार व मोठी अवजड वाहने यांची वाहतूक चालू असते .



रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघातांची संख्या वाढत आहे . आज राहुरीकरांच्या वतीने विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस व तहसील कार्यालयावर आज मोठा मोर्चा काढला .



यावेळी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले . प्राजक्त तनपुरे म्हणाले की ,  अपघात ग्रस्त कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे . या रस्त्यावर अपघातात इतके बळी पडूनही सरकार निष्ठूरपणे वागत असून येत्या आठवडाभरात संबंधित


अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी , अन्यथा मोठे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल .

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले . बलमे कुटुंब , जगधने कुटुंब व अन्य अपघातग्रस्त कुटुंबाला शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्यात यावी व या रस्त्याच्या ठेकेदारावर व राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी करण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments