Type Here to Get Search Results !

सोनई तरुण हल्ला प्रकरण : 25 तारखेला रास्ता रोकोचा इशारा

सोनई तरुण हल्ला प्रकरण : 25 तारखेला रास्ता रोकोचा इशारा



 अहिल्यानगर  ( प्रतिनिधी )

सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने पोलीस अधिक्षक,  अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले .



सोनई येथील तरुणावर काही जातीवादी व्यवस्थेने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे , त्याचा निषेध म्हणून  निवेदन घेऊन डी वाय एस पी शिरीष वमणे  यांना निवेदन दिले .



या प्रकरणी एक आरोपी अटक आहे , उर्वरित दहा आरोपी फरार आहेत .  त्यांना लवकरात लवकर अटक झाली नाही तर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व आंबेडकर चळवळीतील



बहुजन विचारधारेचे सर्वच चळवळीतील कार्यकर्ते २५ तारखेला नगर औरंगाबाद रोड घोडेगाव येथे रास्ता रोको करणार आहेत .

त्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी , अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली . यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष नंदू  शिंदे , राज्य प्रवक्ते निलेश  जगधने , राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड, तालुका कार्याध्यक्ष सचिन नन्नवरे, अ‍ॅड. कुमार भिंगारे, सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे, वाहतूकचे जिल्हाध्यक्ष बाबा आडगळे, वाहतूक तालुका अध्यक्ष श्याम नन्नवरे, गुहा शाखाध्यक्ष अमोल भांड, सचिन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments