दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी चित्रपट सृष्टीला नवी दिशा
लोणी प्रतिनिधी - ज्ञानेश्वर साबळे
दिवाळीच्या मंगल, क्षणी, भावड्या या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा भव्य शुभमुहूर्त अत्यंत उत्साहात पार पडला .
ह. भ. प इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या शुभ हस्ते त्यांच्या विनोदी प्रबोधन पर शैलीने वातावरण अधिकच रंगतदार बनले .
या चित्रपटाचे मुख्य भूमिका आणि दिग्दर्शक आहेत प्रमोद पंडित ज्यांनी या चित्रपटात सामाजिक संदेशासह मनोरंजनाची मेजवानी देण्याचे वचन दिले आहे .
चित्रपटाचे निर्माते आबा निर्मळ यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून तर प्रत्येक मराठी माणसाच्या भावनांना स्पर्श करणारा आहे त्यांना साथ दिली सहनिर्माते ज्ञानदेव शिंदे आणि प्रोडक्शन मॅनेजर ज्ञानेश्वर साबळे,यांनी यांच्या प्रयत्नांनी हा चित्रपट आणखी भव्य होणार आहे या सोहळ्याला अनेक मान्यवर कलाकार व साहित्यिक गडकिल्ल्यांचे पुस्तकाचे प्रकाशन झाले भावड्या चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी येणार आहे




Post a Comment
0 Comments