सुवर्ण भरारी संस्थेची पुरस्कार वितरण समितीची बैठक संपन्न : पुरस्कार सोहळा लवकरच
लोणी ( प्रतिनिधी )
सुवर्ण भरारी ग्रुप संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा नियोजन बाबत शनिवार दिनांक 11 ऑक्टोबरला लोणी येथे श्रीचिंतामणी यांच्या निवासस्थानी पार पडली.
राज्यस्तरीय सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थे च्या वतीने पुढील महिन्याच्या प्रारंभी अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे .
याबाबत लोणी येथे बैठक संपन्न झाली सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम करण्यात आले असून पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांचाही या संस्थेच्या कामात मोलाचा वाटा आहे लोणी येथे झालेल्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सारिका ताई नागरे , रवीशेठ माळवे , जी के चिंतामणी , गुरुनाथ बोराडे , श्री अर्जुन टाक , सोमनाथ आहेर , ज्ञानेश्वर साबळे , नितीन चिंतामणी , प्रकाश मैड , दहिवाळ हरीदास , शंकर सोनवणे , सौ स्वाती मुंडलिक , सौ चिंतामणी शकुंतला ,पांडुरंग शेवंते , श्रीपाद बोकंद आदी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली.
या वेळी अर्जन टाक, ज्ञानेश्वर साबळे, शंकर सोनवणे, यांचा सत्कार करण्यात आला तसेच सोमनाथ आहेर यांना संस्थेचे ओळख पत्र प्रसिद्धी प्रमुख रवि माळवे यांचा हस्ते देण्यात आले .



Post a Comment
0 Comments