संकटात धावून जाणाऱ्या नंदकुमार मोरे यांचे उपचारा दरम्यान निधन
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी तालुक्यातील राहुरी कॉलेज परिसर येथील रहिवाशी नंदकुमार भीमराव मोरे, वय 44 वर्षे यांचे आज दि. 12 ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी पी एम टी हॉस्पिटल प्रवरानगर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
ते राहुरी नगरपरिषदे मध्ये अग्निशमन दलात कार्यरत होते. राहुरी शहरासह तालुक्यातील अनेक आपत्कालीन व संकटाच्या वेळी नंदकुमार मोरे व त्यांचा आपत्कालीन विभाग सतर्क राहायचा .
नंदकुमार भीमराव मोरे यांचा आठ दिवसापूर्वी कोल्हार येथे अपघात झाला होता. त्यांना उपचार करण्यासाठी प्रवरानगर येथील पी एम टी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गणपती घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मले, दोन बहीनी, चुलते परिवार असून . त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे .


Post a Comment
0 Comments