Type Here to Get Search Results !

राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन

राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन 



सतर्क खबरबात जिल्ह्याची - निधन वृत्त


राज्याचे माजी मंत्री, नगर–पाथर्डी-राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. ते 67 वर्षांचे होते भारतीय जनता पक्षाकडून दुसऱ्यांदा ते निवडून आमदार झाले होते .



बुरानगर सारख्या ग्रामीण भागातून व्यापक जनसंपर्क वाढवत त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. व्यापक जनसंपर्क असलेला नेता नगर जिल्ह्यानं गमावला आहे. 

आमदार कर्डिले यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता  बुऱ्हाणनगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कर्डिले यांच्या दुखद निधनाचे वृत्त समजतात त्यांच्या हजारो समर्थक व कार्यकर्त्यांनी बुरानगर येथे धाव घेतली आहे .



दरम्यान, आमदार कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.. आमदार कै. कर्डिले हे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे तर युवा नेता अक्षय कर्डिले यांचे वडील होते. आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments