राहुरीतील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची भरपाई जमा होण्यास सुरुवात
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून आज सायंकाळी
राहुरी शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे पैसे जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत .
राहुरीसह नगर जिल्ह्यात ऑगस्ट , सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली होती . त्यानंतर शासनाच्या आदेशाने सर्वत्र नुकसान झालेल्या पिकांची पंचनामे करण्यात आले. सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शासनाने तुटपुंजी का होईना मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती.
मात्र. राहुरी तालुक्यातील केवळ काही टक्के इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते , त्यामुळे प्रतीक्षा कायम होती . आज सायंकाळी राहुरी शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे पैसे जमा झाल्याचे संदेश येत होते .


Post a Comment
0 Comments