डॉ. तनपुरे यांच्या स्वप्नातील शेतकरी सूतगिरणीचा लिलाव प्रक्रिया सुरू ; 36.76 हेक्टर आर क्षेत्र व मशिनरी चीही होणार विक्री
यापूर्वीही सहकारी संस्थेच्या जमिनीचा झालाय लिलाव..
राहुरी ( विशेष वृत्त )
तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेली शेतकरी सहकारी सूतगिरणी आता अवसायनात निघाल्याने तिच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासकांच्या वतीने सुरू झालेल्या या लिलावामुळे पुन्हा एकदा राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या सूतगिरणीचा लिलाव सुमारे ९० एकर जागा आणि प्रेसिंग मशिनरीसह करण्यात येणार असून, एकूण मूल्यांकन किंमत तब्बल २३ कोटच्या पुढे इतकी रक्कम ठेवण्यात आली आहे. तर प्रेसिंग मशिनरीसाठी स्वतंत्रपणे २३ लाख रुपयांच्या पुढे किंमत निश्चित करण्यात आली आहे.
सदर लिलाव प्रक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, राहुरी येथील अभिरक्षक गोकुळ मोहन नांगरे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
यापूर्वी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याशी संलग्न शिक्षण प्रसारक मंडळाची राहुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली अंदाजे पाऊन एकरच्या पुढे हि जागा आठ कोटींपेक्षा जादा लिलावात विकली गेली होती. तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती शाळेसमोरील जागेचाही लिलाव झाला होता.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तनपुरे गटाने सत्ता ताब्यात मिळवली आहे.
राहुरी बाजार समितीमार्फत यापूर्वीच जिनिंग-प्रेसिंगची जागा खरेदी करण्यात आली आहे.
त्यामुळे आता या सूतगिरणीच्या लिलावात बाजार समिती, कारखाना वा इतर उद्योगपती यात सहभागी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments